सैराट' चित्रपटातून धडाकेबाज एंट्री करत सर्वांची मनं जिंकणाऱ्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुचे आई-वडीलही आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा, लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणावर आधारित आहे. या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचं रुपांतर मोठ्या जनआंदोलनात होतं. मात्र हे झालेलं रुपांतर त्याला कळतं नाही. त्याच्या समोर केवळ एकच लक्ष्य असतं, आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणं हे.‘एक मराठा लाख मराठा’ हा चित्रपट गणेश शिंदे या तरुणानं दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची निर्मिती साई सिने फिल्म्सनं केली आहे, तर संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसंच, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते अलिकडेच या चित्रपटातं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews